बस अपघातात चार विद्यार्थिनी जखमी
By Admin | Updated: February 10, 2017 02:09 IST2017-02-10T02:09:23+5:302017-02-10T02:09:23+5:30
धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनी सहलीसाठी जात असताना गाढवी नदीच्या वळणावर

बस अपघातात चार विद्यार्थिनी जखमी
दोन बसची धडक : धानोरा बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनी
आरमोरी : धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनी सहलीसाठी जात असताना गाढवी नदीच्या वळणावर बसला अपघात झाल्याने चार विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना गुरूवारी १०.१५ वाजता घडली.
जखमी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये निर्मल मतरू उसेंडी (१६), अंजली दिवाकर अलवलवार (१४), ललिता चंदरसाय हलामी (१५), ममिता अंताराम आतला (१५) असे जखमी झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. शैक्षणिक उपक्रमांतर्गत धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील १३२ विद्यार्थिनींची सहल गोसेखुर्द धरण व रामटेक (खिंडसी) येथे नेण्यात येत होती. त्यासाठी एसटी राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस भाड्याने घेण्यात आल्या होत्या. तिन्ही बसेस एकामागोमाग जात असताना गाढवी नदीजवळील वळण रस्त्यावर रोडरोलर बससमोर आल्याने पहिल्या बसच्या चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे दुसऱ्या बसचालकानेही ब्रेक दाबून वेग कमी केला. मात्र तिसऱ्या बसने दुसऱ्या बसला धडक दिली. या धडकेत दुसऱ्या बसमधील चार विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी आरमोरी रूग्णालयात भरती केले. सायंकाळी चारही विद्यार्थिनींची सुटी करण्यात आली. (वार्ताहर)