नक्षलपीडित कुटुंबीयांना चार लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 01:39 IST2017-03-01T01:39:40+5:302017-03-01T01:39:40+5:30
पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासन

नक्षलपीडित कुटुंबीयांना चार लाखांची मदत
सिरोंचा : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासन व पोलीस विभागाच्या वतीने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
तालुक्यातील पातागुडम येथील कमला संटी गोरकोंडा यांना मंगळवारी राज्य शासन व पोलीस विभागाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. पातागुडम पोलीस मदत केंद्र सुरू होण्यापूर्वी संटी गोरकोंडा यांची नक्षल्यांनी हत्या केली होती. (शहर प्रतिनिधी)