जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चार जणांचे सात अर्ज रद्द
By Admin | Updated: April 2, 2015 01:43 IST2015-04-02T01:43:04+5:302015-04-02T01:43:04+5:30
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चार जणांचे सात अर्ज रद्द
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीतील उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी करण्यात आली. सात उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले.
उमेदवारी अर्ज रद्द झालेल्यांमध्ये नागरी पतसंस्था, मच्छीमार संस्था, जंगल कामगार संस्था इत्यादींच्या ‘ई’ गटातून बाबुराव बेंडूजी बावणे यांचे दोन तर राजेंद्र धोंडबा मने यांचा एक उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. तसेच नागरी सहकारी बँक गट ‘ग’ म्हणून प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांचाही उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. याशिवाय ‘र’ गट विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग मधून बाबुराव बेंडुजी बावणे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे.
तर ‘र’ गट इतर मागास वर्ग म्हणून बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ. बळवंत मारोतराव लाकडे व ‘र’ गट अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातून घनशाम लहूजी मडावी यांचाही एक उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)