अपघातात सी-६० चे चार जवान जखमी

By Admin | Updated: November 10, 2015 01:56 IST2015-11-10T01:56:08+5:302015-11-10T01:56:08+5:30

एटापल्ली तालुका मुख्यालयावरून सुमो वाहनाने पोलीस पार्ट्या जात असताना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एटापल्लीपासून ४ किमी अंतरावर गुरूपल्ली ....

Four C-60 wounded in the accident | अपघातात सी-६० चे चार जवान जखमी

अपघातात सी-६० चे चार जवान जखमी

दोन गंभीर : गुरूपल्लीनजीक वाहन उलटले
एटापल्ली : एटापल्ली तालुका मुख्यालयावरून सुमो वाहनाने पोलीस पार्ट्या जात असताना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एटापल्लीपासून ४ किमी अंतरावर गुरूपल्ली गावानजीक पोलिसांचे वाहन उलटले. यात सी-६० चे चार जवान जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली.
जखमी झालेल्या सी-६० पोलीस जवानामध्ये वाहनचालक दत्ता रवगडे, साधू पल्लो, किशोर सिडाम, सुनील चापले यांचा समावेश आहे. एटापल्लीवरून अहेरीला सुमो वाहनाने जात असताना गुरूपल्ली गावाजवळ पोलीस जवानांचे वाहन उलटले. यात सी-६० चे चार पोलीस जवान जखमी झाले. तत्काळ या चारही जखमी जवानांना एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून किशोर सिडाम व सुनील चापले या दोघांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर प्रकृती गंभीर असलेले दत्ता रवगडे व साधू पल्लू या दोघांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात चारही जखमी जवानांवर उपचार सुरू असताना एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव उपस्थित होते. किशोर सिडाम व सुनील चापले यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Four C-60 wounded in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.