कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:11+5:302021-06-06T04:27:11+5:30
चामाेर्शी : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजकुमार घाेडेस्वार, जिल्हाध्यक्ष गंगाधर मडावी यांच्या मार्गदर्शनात कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद ...

कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी गठित
चामाेर्शी : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजकुमार घाेडेस्वार, जिल्हाध्यक्ष गंगाधर मडावी यांच्या मार्गदर्शनात कास्ट्राईब ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली चामाेर्शी तालुक्यातील ग्रामसेवकांची झूम ॲपद्वारे सभा पार पडली. या सभेत चामाेर्शी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.
तालुकाध्यक्षपदी राकेश अलाेने, सचिवपदी रजनी मेश्राम, उपाध्यक्ष भरत सरपे, काेषाध्यक्ष वसंत बारसागडे, सदस्य सहसचिव मकरंद बांबाेळे, महिला उपाध्यक्ष प्रभा सिडाम, राेशनी सहारे, सदस्य म्हणून चंद्रकुवर कुमरे, राधेश्याम उईके, सुरेश पुंगाटी, प्रकाश सलामे, धनंजय शेंडे, रूपेश दुर्गे, प्रशांत रामटेके, गुरुदास निमगडे, सिद्धार्थ मेश्राम, याेगाजी कन्नाके, इंद्रावन बारसागडे, उमाजी शंभरकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी सरचिटणीस मनाेेज गेडाम, काेषाध्यक्ष देवेंद्र साेनपिपरे, संजीव बाेरकर उपस्थित हाेते.