वनरक्षक व वनपाल संघटनेची कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:34 IST2020-12-29T04:34:20+5:302020-12-29T04:34:20+5:30

आलापल्ली : महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटनेची सभा वन विश्रामगृह आल्लापल्ली येथे पार पडली. सभेला प्रदेश महासचिव इंद्रजित बारस्कर, ...

Formed the executive committee of forest rangers and foresters association | वनरक्षक व वनपाल संघटनेची कार्यकारिणी गठित

वनरक्षक व वनपाल संघटनेची कार्यकारिणी गठित

आलापल्ली : महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटनेची सभा वन विश्रामगृह आल्लापल्ली येथे पार पडली. सभेला प्रदेश महासचिव इंद्रजित बारस्कर, सल्लागार एम. गाजी पटेल, राजेश पिंपळकर, बाळू मडावी, जी.एल. बाळापुरे उपस्थित हाेते. केंद्रीय सचिव चंद्रशेखर तोम्बर्लावार यांची वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गडचिरोली वन वृत्ताची वृत्तीय कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी नितेश कुमरे, कार्याध्यक्ष श्रीकांत सेलोटे, सचिव शैलेश करोडकर, उपाध्यक्ष हरीश दहागावकर, महिला आघाडी प्रमुखपदी रसिका मडावी यांची निवड करण्यात आली.

तसेच केंद्रीय कार्यकारिणीत बाळू मडावी व गाजी पटेल यांची निवड झाली. विभागीय कार्यकारिणीत अध्यक्षपदी एस.पी.धानोरकर, कार्याध्यक्ष अतुल कातलाम, सचिव राजेंद्र घोरुडे, उपाध्यक्ष कवीश्वर भांडेकर, सचिन धात्रक, सल्लागार संतोष पडालवार, महिला प्रतिनिधी म्हणून नेहा मांदाडे, निराशा मेश्राम, हर्षा घरत, सहसचिवपदी देवानंद कचलामी, समाधान चाथे, बी.डी. राठोड, चंद्रकांत सडमेक, संघटकपदी एस.पवार यांची निवड करण्यात आली.

Web Title: Formed the executive committee of forest rangers and foresters association