विद्यापीठाच्या परिषदांचे गठन

By Admin | Updated: May 8, 2015 01:32 IST2015-05-08T01:32:48+5:302015-05-08T01:32:48+5:30

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत परिषदेचे गठन ७ मे रोजी महाराष्ट्र शासनाने केले आहे.

Formation of university councils | विद्यापीठाच्या परिषदांचे गठन

विद्यापीठाच्या परिषदांचे गठन

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत परिषदेचे गठन ७ मे रोजी महाराष्ट्र शासनाने केले आहे.
विद्वत परिषदेचेही पदसिध्द अध्यक्ष म्हणून कुलगुरूच राहणार आहेत. विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. विवेक विष्णूपंत जोशी, डॉ. नंदा सातपुते, डॉ. चक्रधर निखाडे, डॉ. अंजली हस्तक, डॉ. राजेश चंदनपाट, डॉ. झेड. जे. खान, डॉ. जुगलकिशोर मुलचंदाजी सोमानी यांची निवड झाली आहे. कला विद्या शाखेचे अभ्यास मंडळाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. परमानंद बावणकुळे, डॉ. शैलेंद्र शुक्ला, डॉ. पी. अरूण प्रकाश यांची नियुक्ती झाली आहे.
समाज विज्ञान विद्याशाखेच्या अभ्यास मंडळाचे सभापती म्हणून डॉ. रश्मी बंड, डॉ. राजेश गायधणे, डॉ. जी. एस. तामगडे, डॉ. राजेंद्र मुद्दमवार, डॉ. पद्मा पंडे, डॉ. सतिश कन्नाके, डॉ. विशाखा कायंदे, डॉ. हंसा तोमर, डॉ. अनिल भोयर, डॉ. सुरेश खंगार यांची नियुक्ती झाली आहे. विज्ञान विद्याशाखेच्या अभ्यास मंडळाचे सभापती प्रतिनिधी म्हणून डॉ. मिलिंद एस. देशपांडे, डॉ. मनोरंजन मंडल, डॉ. अभय साळुंखे, डॉ. विवेक भांदककर, डॉ. एस. एस. सिंगरू, डॉ. सी. के. डोर्लीकर, डॉ. मृणाल काळे, डॉ. सुरेश बाकरे, डॉ. विजूताई गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. शिक्षण विद्या शाखेच्या अभ्यास मंडळाचे सभापती प्रतिनिधी म्हणून डॉ. अशोक जीवतोडे, डॉ. दिलीप जयस्वाल, वाणिज्य विद्याशाखा अभ्यास मंडळाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अनिल गिरीपूंज, डॉ. श्रीराम गहाणे, अभियांत्रिकी विद्याशाखा मंडळाचे सभापती प्रतिनिधीपदी डॉ. मनिष उत्तरवार यांची निवड झाली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Formation of university councils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.