वन कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ मिळणार

By Admin | Updated: December 13, 2014 01:56 IST2014-12-13T01:56:02+5:302014-12-13T01:56:02+5:30

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग नागपूर यांनी ७ आॅगस्ट २००२ च्या शासन निर्णयानुसार एकस्तर वेतन निश्चितीचा लाभ ...

Forest workers will get a one-time wage benefit | वन कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ मिळणार

वन कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ मिळणार

गडचिरोली : अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग नागपूर यांनी ७ आॅगस्ट २००२ च्या शासन निर्णयानुसार एकस्तर वेतन निश्चितीचा लाभ देण्याबाबत आणि नक्षलग्रस्त भागासाठी मंजूर प्रोत्साहन भत्ता तत्काळ लागू करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली वनवृत्त यांना कळविले असल्याची माहिती कास्ट्राईब वनकर्मचारी संघटना व कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांनी दिली आहे.
गडचिरोली वनवृत्तातील सर्वच कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता व एकस्तर वेतनाचा लाभ आजपर्यंत मिळत नव्हता. जून २०१४ पासून कास्ट्राईब वनकर्मचारी संघटना यांनी गडचिरोली वनवृत्तातील सर्व कर्मचाऱ्यांना इतर विभागाप्रमाणे वरील लाभ मिळावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे एकस्तर वेतन निश्चिती व १५ टक्के प्रोत्साहन भत्ता सादरीकरणाबाबत व वेगवेगळ्या विभागातील देण्यात येत असलेल्या लाभाबाबतची माहिती समजावून दिली, असे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सोनडवले, सचिव सिद्धार्थ मेश्राम, सुधीर वेठे, नामदेव बन्सोड, विजय कंकलवार, विनोद धात्रक, शब्बीर शेख, बंडू वडेट्टीवार आदींनी सांगितले आहे. त्यानंतर आता १० डिसेंबर रोजी अप्पर प्रधान मुख्य सचिव यांनी सदर मागणी मान्य करून या संदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश गडचिरोली वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकांना दिले आहेत.

Web Title: Forest workers will get a one-time wage benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.