घोट येथे वन कर्मचाऱ्यांंचे आंदोलन
By Admin | Updated: November 2, 2015 01:12 IST2015-11-02T01:12:54+5:302015-11-02T01:12:54+5:30
जुनी पेंशन योजना बंद करुन अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केल्याच्या निषेधार्थ शनिवारी घोट येथे वन कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून राज्य शासनाचा निषेध केला....

घोट येथे वन कर्मचाऱ्यांंचे आंदोलन
काळ्याफिती लावल्या : अंशदान निवृत्ती वेतन योजनेचा निषेध
गडचिरोली : जुनी पेंशन योजना बंद करुन अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केल्याच्या निषेधार्थ शनिवारी घोट येथे वन कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून राज्य शासनाचा निषेध केला.
वन कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) लागू केली. १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांंना निवृत्तीवेतन मिळत असे. त्यातून सेवानिवृत्तीनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येत असे. शिवाय भविष्य निर्वाह निधीचीही सोय होती. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ व निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम १९८४ नुसार निवृत्तीनंतर कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन, सामाजिक सुरक्षितता या बाबी विचारात घेऊन निवृत्तीवेतन दिले जाते. शासनाने अंशदान पेंशन योजना लागू करुन कर्मचाऱ्यांंवर अन्याय केला आहे.