वन विभागाने उद्ध्वस्त केला दारू अड्डा
By Admin | Updated: May 13, 2015 01:16 IST2015-05-13T01:16:51+5:302015-05-13T01:16:51+5:30
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा (कं.) वन परिक्षेत्रातील सुभाषग्राम व राममोहनपूर गावातील जंगल परिसरात घोट वन विभाग व पोलिसांनी संयुक्त धाड घालून साडेचार लाखांची दारू पकडली.

वन विभागाने उद्ध्वस्त केला दारू अड्डा
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा (कं.) वन परिक्षेत्रातील सुभाषग्राम व राममोहनपूर गावातील जंगल परिसरात घोट वन विभाग व पोलिसांनी संयुक्त धाड घालून साडेचार लाखांची दारू पकडली. रविवारी पहाटे ३.३० वाजता सदर कारवाई करण्यात आली.
आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांच्या मार्गदर्शनात मार्र्कंडा वन परिक्षेत्रातील बहादूरपूर भागात कक्ष क्रमांक १४९३ व १४९५ भागात सुभाषग्राम व राममोहनपूर गावाजवळ मोहफूल व गुळाद्वारे दारू काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने येथे पहाटे ३.३० वाजता धाड घातली. दोन आरोपी जंगलात पळून गेले. घटनास्थळावरून १८ लोखंडी बॅरेल व २० प्लास्टिक बॅरेल जप्त करण्यात आले. तसेच ५० किलो गुळाची बॅगही जप्त करण्यात आली. त्यानंतर सदर घटनेचा पंचनामा करून वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांच्यासह सहायक वनसंरक्षक हरिश्चंद्र वाघमोडे, मार्र्कंडा वन परिक्षेत्राचे क्षेत्रपाल शेखर तनपुरे, घोट पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक नीलेश पोल, क्षेत्र सहायक कोवे, शेंडे, धाईत, वनरक्षक राहूल शिरभैये, घोगरे, शेंडे, कोसनकर, मद्देर्लावार, शिंदे, बेपारी, वाटगुरे, राऊत, आलापल्लीचे वनरक्षक निलम, मडावी, घुटके, वनपाल घोडके आदींनी केली. या प्रकरणात पुढील तपास उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (प्रतिनिधी)