शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

वनविभागाचा डेपो आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:00 AM

आलापल्ली-एटापल्ली मुख्य मार्गावरील आलापल्लीपासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या जवळपास सहा हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वन विभागाच्या जळाऊ लाकडाच्या डेपोला आग लागली. या घटनेची माहिती कळताच वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वारा असल्याने व सागवानी बिट पूर्णत: सुकले असल्याने आग आटोक्यात येणे अशक्य होते.

ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : ५०० पेक्षा अधिक बिट जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली वनविभागाअंतर्गत याच वनपरिक्षेत्रातील आलापल्ली येथील खसरा आगाराला भीषण आग लागल्याने या आगीत ५०० पेक्षा अधिक जळाऊ बिट खाक झाल्याची घटना सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास घडली.आलापल्ली-एटापल्ली मुख्य मार्गावरील आलापल्लीपासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या जवळपास सहा हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वन विभागाच्या जळाऊ लाकडाच्या डेपोला आग लागली. या घटनेची माहिती कळताच वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वारा असल्याने व सागवानी बिट पूर्णत: सुकले असल्याने आग आटोक्यात येणे अशक्य होते. त्यानंतर वनविभागाने स्वत:कडील पाणी टँकर व अहेरी नगर परिषदेचे अग्निशमन वाहन बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दोन जेसीबी लावून लगतचे सागवानी बिट आगीपासून दूर करण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.घटनास्थळी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, वनपरिक्षेत्राधिकारी गणेश लांडगे यांच्यासह कर्मचारी आग विझविण्याच्या कामात व्यस्त होते. या डेपोमधील वनोपजाचा तपशील दर्शक बोर्ड कोरा असल्याने नेमके आकडे मिळू शकले नाही.आग लागली कशी?आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. ही आग कशी लागली याचा शोध वनविभाग व पोलीस घेत आहेत. बरेच युवक आईवडिलांपासून लपून-छपून सिगारेट ओढण्यासाठी व गांजा पिण्यासाठी सदर वनडेपोतील बिटाच्या आड बसून राहात असल्याचे दिसून येत आहेत. कुणीतरी जळती सिगारेट कचऱ्यात फेकली असेल तर त्यापासूनही आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू आहे. रात्री बराच वेळपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

टॅग्स :forestजंगलfireआग