तीन हजारांची लाच मागणाऱ्या वनविभागाच्या लिपिकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:16+5:302021-02-05T08:52:16+5:30
घाेट : वनविभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याकडून त्याचा प्राेत्साहन भत्ता मंजूर केल्याचा माेबदला म्हणून तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ...

तीन हजारांची लाच मागणाऱ्या वनविभागाच्या लिपिकास अटक
घाेट : वनविभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याकडून त्याचा प्राेत्साहन भत्ता मंजूर केल्याचा माेबदला म्हणून तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या घाेट वनपरिक्षेत्र कार्यालयातील लिपिकाविराेधात चामाेर्शी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
हास्यवंदन बाळकृष्ण बाळेकरमकर (४१) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. नागेपल्ली येथील रहिवासी असलेल्या व वनविभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा २०१६ पासूनचा प्राेत्साहन भत्ता बॅंक खात्यात जमा केला. त्यासाठी हास्यवंदन याने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती. याबाबतची तक्रार संबंधित व्यक्तीने एसीबीकडे दाखल केली. हास्यवंदन याने संबंधित व्यक्तीकडून तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे कबूल केल्याने त्याच्या विराेधात चामाेर्शी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पाेलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पाेलीस हवालदार नत्थू धाेटे, सतीश कत्तीवार, महेश कुकुडकर, किशाेर ठाकूर, घनश्याम वडेट्टीवार यांच्या पथकाने केली.