फुटबॉल खेळ सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करणे गरजेचे
By Admin | Updated: August 24, 2015 01:30 IST2015-08-24T01:30:41+5:302015-08-24T01:30:41+5:30
फुटबॉल हा सर्वसामान्यांचा खेळ असून या खेळाला लोकप्रिय करणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्ह्यात या खेळाला नवा चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे,

फुटबॉल खेळ सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करणे गरजेचे
रवींद्र दरेकर यांचे आवाहन : खुल्या फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा
चामोर्शी : फुटबॉल हा सर्वसामान्यांचा खेळ असून या खेळाला लोकप्रिय करणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्ह्यात या खेळाला नवा चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उद्गार गडचिरोली जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष रवींद्र दरेकर यांनी काढले.
नेताजी स्पोर्टस व कल्चरल क्लब सुभाषनगरतर्फे आयोजित खुल्या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य बंगाली युवक कल्याण मंडळाचे अध्यक्ष दीपक हलदर होते. जिल्ह्यातील १७ वर्षांखालील २ खेळाडूंना राज्यस्तरावरील प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीवर निर्वाचित झाल्याबद्दल रवींद्र दरेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरीसा या राज्यातील एकूण ४२ चमुंनी भाग घेतला आहे. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव सतिश पवार, सतीश रॉय, विनोद खोबे, सुभाषग्रामचे सरपंच शिशांत रॉय, सुधीर झंझाळ, विधान बेपारी, गोपाल दास, धर्मराज रॉय आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत मलिक यांनी तर प्रास्ताविक विधान बेपारी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)