नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:54+5:302021-05-05T04:59:54+5:30

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ नुसार शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात १४ एप्रिल रोजी ...

Follow the rules, otherwise take action | नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई

नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ नुसार शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतापासून ते ३० एप्रिलपर्यंत १५ दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्याची मुदत संपताच पुन्हा १ मे ते १५ मे २०२१ अशी १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व भाजीपाला विक्रेत्यांना विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ असे चार तास उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वीकेंड लाॅकडाऊन म्हणून शनिवार व रविवार असे दोन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोमवार, ३ मेपासून संचारबंदीचा दुसरा टप्पा सुरू आहे. मंगळवारी तहसीलदार एच. एस. सय्यद व नायब तहसीलदार प्रकाश पुपलवार हे आपल्या अधिनस्त कर्मचारी व दोन पोलिसांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येते होते. दिलेल्या वेळेचे भान ठेवून वेळेत दुकान बंद करण्याचे निर्देश दुकानदारांना देत होते यावेळी विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीधारकांना समज देण्यात आली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सिरोंचा तालुक्यातही वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Follow the rules, otherwise take action