पेन्शनसाठी पाठपुरावा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:14 IST2018-12-17T00:13:16+5:302018-12-17T00:14:41+5:30
दिल्लीतील आमआदमी पार्टी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही ही योजना लागू करावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे....

पेन्शनसाठी पाठपुरावा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : दिल्लीतील आमआदमी पार्टी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही ही योजना लागू करावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे आम आदमी पार्टीचे प्रदेश विदर्भ प्रमुख देवेंद्र वानखेडे, चंद्रपूर लोकसभा प्रमुख पवार, आरमोरी विधानसभा प्रमुख विजय समर्थ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यांनी २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली. मात्र सदर योजना अन्यायकारक असल्याने देशभरातून या योजनेविरोधात मागील पाच वर्षांपासून तीव्र लढा दिला जात आहे. दिल्ली येथील कर्मचाºयांनीही जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी लढा उभारला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. त्यानुसार दिल्ली सरकारने अंमलबजावणी सुध्दा सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनानेही जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाºयांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, त्याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आम आदमी पार्टीने जुनी पेन्शनचा मुद्दा सहभागी करून घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीचे उपाध्यक्ष अंकूश मैलारे, प्रशांत ठेंगरी, गणेश आखाडे, सल्लागार विश्वनाथ सोनटक्के, कोषाध्यक्ष देशकर, कापकर, सचिन मेश्राम आदी उपस्थित होते.