लोकबिरादरीत विद्यार्थ्यांनी साकारली शैक्षणिक गंमत जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:25+5:30

गंमत जत्रेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाने, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे, प्राचार्य डॉ.विलास तळवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

In the folklore, the students share their educational fun | लोकबिरादरीत विद्यार्थ्यांनी साकारली शैक्षणिक गंमत जत्रा

लोकबिरादरीत विद्यार्थ्यांनी साकारली शैक्षणिक गंमत जत्रा

ठळक मुद्देसातवे वर्ष : पाणी विषयावर विविध उपक्रम सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी आश्रमशाळेच्या स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी २५ डिसेंबर रोजी बुधवारला विद्यार्थ्यांनी पाणी या विषयावर उत्कृष्ट शैक्षणिक गंमत जत्रा साकारली.
या गंमत जत्रेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाने, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे, प्राचार्य डॉ.विलास तळवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. व्यवस्थापिका समीक्षा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गंमत जत्रेचे हे सलग सातवे वर्ष आहे. आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पाणी विषयावर विविध उपक्रम सादर केले. सायंकाळी ६ पर्यंत ही गंमतजत्रा प्रदर्शनी सुरू होती.
यशस्वीतेसाठी बंडू कुडयेमी, भक्ती बानोत, तुषार कापगते, विजया पद्मावार, सुरेश गट्टेवार, विनोद समर्थ, शरिफ शेख, जमीर शेख, श्रीराम झोडे, ज्योती तडवेकर, प्रा.खुशाल पवार, प्रा.गिरीश कुलकर्णी आदींनी सहकार्य केले. अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी पाहण्यासाठी गर्दी केली.

महापूर व जलप्रदूषणावर जागृतीपर दिला संदेश
इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या वापराचे चित्र प्रदर्शन, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी जलचक्र, तिसºया विद्यार्थ्यांनी पाणी शुद्धीकरण व बचतीच्या सोप्या पद्धती, इयत्ता चवथीतील विद्यार्थ्यांनी जलप्रदूषण, पाचवीतील विद्यार्थ्यांनी पर्जन्यमापक यंत्र व पावसाचे मोजमाप, सहावीच्या विद्यार्थ्यांनी पॉली हाऊस शेती व पाण्याचा वापर, सातवीच्या विद्यार्थ्यांनी २०१९ वर्षातील भामरागडचा महापूर व महाराष्ट्राचा महाप्रलकारी महापूर, आठवीच्या विद्यार्थ्यांनी भूमिगत पाण्याचा साठा, वापर व प्रदूषणाचा धोका, नववीच्या विद्यार्थ्यांनी पाणी दुष्काळ, कारणे आणि परिणाम व इतर विद्यार्थ्यांनी बाटलीबंद पाणीपुरी स्टॉल आदी उपक्रमातून पाण्याविषयी अनमोल संदेश दिला. नेलगुंडा येथील साधना विद्यालय, जिंजगाव येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी या जत्रेत सहभाग नोंदविला.

Web Title: In the folklore, the students share their educational fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.