महिलांच्या सक्षमीकरणावर भर
By Admin | Updated: September 9, 2014 23:29 IST2014-09-09T23:29:38+5:302014-09-09T23:29:38+5:30
पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ महिलांना स्वयंसहाय्यता गटामार्फत दिला जाईल. त्याबरोबरच जीवनोन्नती अभियानाच्या भविष्यकालीन योजनांच्या माध्यमातून महिलांच्या

महिलांच्या सक्षमीकरणावर भर
अहेरी : पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ महिलांना स्वयंसहाय्यता गटामार्फत दिला जाईल. त्याबरोबरच जीवनोन्नती अभियानाच्या भविष्यकालीन योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन संवर्ग विकास अधिकारी चांदेकर यांनी केले.
जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान कक्षातर्फे रविवारी आलापल्ली वनविभागाच्या सभागृहात पार पडलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी १७० महिलांनी शिधापत्रिका, आधारकार्ड तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरीता नाव नोंदणी करून घेतली. महिला मेळाव्याला कृषी विस्तार अधिकारी फुलझेले, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक राम पवार, सामाजि कार्यकर्त्या सुशिला भगत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी केले. त्यांनी जीवनोन्नती अभियानाबाबत ग्रामीण भागात असलेली गरज स्पष्टपणे नमूद केली. कृषी विस्तार अधिकारी फुलझेले यांनी अभियान व कृषी योजनांची सांगड घालण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य महिलांना केले जाईल, असे प्रतिपादन केले. त्याबरोबरच विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. जीवनोन्नती अभियानामुळे महिलांमधील आत्मविश्वास वाढला आहे. अनेक महिलांमध्ये याविषयी जाणीव जागृती होत आहे. या अभियानामुळे अनेक कामाची प्रभाविपणे अंमलबजावणी होत असल्याचे प्रतिपादन सुशीला भगत यांनी केले. महिला सक्षमीकरण या विषयावर जिल्हा व्यवस्थापक राम पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध योजनांची माहिती उपस्थित मान्यवरांनी महिलांना दिली. कार्यक्रमाचे संचालन शांता खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण डोंगरे, गंगाधर डोर्लीकर, राकेश दुर्गे, मंदा तोफा, रजनी गड्डम, एकता उमरे, मंजू डोंगरे, सुनीता उराडे, विनोद बोबाटे यांच्यासह अनेक महिलांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)