लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी केवळ धान पिकाची शेती करतात. मात्र मोहटोला, किन्हाळा परिसरातील शेतकऱ्यांनी मॅटच्या आच्छादनात भाजीपाला पिकाची लागवड करून त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. विशेष म्हणजे हा महत्त्वाकांक्षी प्रयोग फरी गावात सुरू आहे.फरी हे देसाईगंज तालुक्यातील मोजक्याच लोकवस्तीचे गाव आहे. येथील काही अल्पभूधारक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षापासून भर पावसातही विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा भाजीपाला पिकाच्या उत्पादनाला अरथळा होऊ नये, यासाठी हिरव्या व पांढºया रंगाच्या मॅटचे आच्छादन सदर शेतकरी करीत आहेत. या आच्छादनाखाली कोथिंबीर, पालक, मेथी, मुळा, गाजर, कांदा, लसून आदी पिके घेतले जातात. तसेच आच्छादनाबाहेर गादीवाफे व पाळी तयार करून त्यावर भेंडी, कोहळा, काकडी, चवळी, दोडका यासारख्या भाजीपाल्याचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. यातून बºयापैकी उत्पन्न मिळत असून धानपिकाच्या शेतीला भाजीपाल्याची ही शेती अतिशय पुरक व फायदेशिर असल्याचे उत्पादक शेतकºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.फरी गावालगत ६० वर्षीय अभिमन दिघोरे नामक शेतकºयाची दीड एकर शेतजमीन आहे. एका एकरात धानाचे व अर्ध्या एकरामध्ये भाजीपाल्याचे पीक दिघोरे घेत आहेत. आतापर्यंत मजुरीसह ५० हजार रुपयांचा खर्च या शेतकºयांनी भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी केला आहे. चवळी, कोथिंबीर, पालक, भेंडी आदींचे उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व पिकांपासून लागवड खर्च वजा जाता दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे, अशी अपेक्षा या शेतकºयांनी लोकमतशी बोलताना दिले आहे. शेतीच्या कामात दिघोरे यांची पत्नी त्यांना पूर्णत: मदत करीत आहे. शासनाने पावसाळ्यात भाजीपाला पिकाची शेती करण्यासाठी आमच्यासारख्या सामान्य शेतकºयांना टिनाचे शेड उभारण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज आहे. अशा प्रकारे अनुदान मिळाल्यास बरेच शेतकरी बारमाही भाजीपाला पिकाचे उत्पादन घेऊ शकतात, असाही मानस शेतकरी अभिमन दिघोरे यांनी व्यक्त केला आहे.
मॅटच्या आच्छादनात फुलले भाजीपाल्याचे पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST
फरी हे देसाईगंज तालुक्यातील मोजक्याच लोकवस्तीचे गाव आहे. येथील काही अल्पभूधारक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षापासून भर पावसातही विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा भाजीपाला पिकाच्या उत्पादनाला अरथळा होऊ नये, यासाठी हिरव्या व पांढºया रंगाच्या मॅटचे आच्छादन सदर शेतकरी करीत आहेत.
मॅटच्या आच्छादनात फुलले भाजीपाल्याचे पीक
ठळक मुद्देफरी गावात महत्त्वाकांक्षी प्रयोग : कृतीशील शेतकऱ्यांची आधुनिक शेती