गडचिरोलीतील पूर ओसरला; भामरागडात चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:42 IST2019-08-10T13:42:16+5:302019-08-10T13:42:42+5:30
अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला सर्वाधिक फटला बसला. आता पूर ओसरला असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे.

गडचिरोलीतील पूर ओसरला; भामरागडात चिखलाचे साम्राज्य
ठळक मुद्देघर-दुकाने, बाजारपेठा सर्वत्र चिखलच चिखल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला सर्वाधिक फटला बसला. आता पूर ओसरला असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे. पर्लकोटा नदीचे पाणी उतरल्याने नदीकाठच्या गावांमधील दुकाने, रस्ते, घरे सर्वत्र चिखल झाला आहे. या पुरात कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. शेतीची कामे सोडून आता घराची व दुकानांची डागडुजी करण्यावर येथील नागरिकांना आता अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.