सलग दुसऱ्याही दिवशी पूर परिस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:00:57+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेवस्थानला वैनगंगा नदीच्या पुराने वेढा घातला. रविवारी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर सोमवारी पुराची पातळी वाढली. गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित जागेचा आधार घेतला. चामोर्शी तालुका मुख्यालयाशी मार्र्कंडादेव गावाचा रविवारपासूनच संपर्क तुटला होता.

The flood situation persisted for the second day in a row | सलग दुसऱ्याही दिवशी पूर परिस्थिती कायम

सलग दुसऱ्याही दिवशी पूर परिस्थिती कायम

ठळक मुद्देशेकडो घरांमध्ये पाणी शिरले : जोमात आलेले पीक पाण्याखाली, शेतकऱ्यांची वाढली चिंता

गडचिरोली : गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे उत्तर व दक्षिण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. गेल्या दोन दिवसांपासून ही पूरपरिस्थिती कायम असून शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. या पूर परिस्थितीचा फटका देसाईगंज, आरमोरी व गडचिरोली तालुक्याला जास्त बसला. शेकडो हेक्टरमधील धान व इतर पीक पाण्याखाली आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. आरमोरीसह १० पेक्षा अधिक मार्ग बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाच्या वतीने उचित खबरदारी घेतली जात असून नुकसानग्रस्त नागरिकांकडून सर्वेक्षणाची मागणी होत आहे.

मार्र्कंडादेवस्थान पुराच्या पाण्याखाली
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेवस्थानला वैनगंगा नदीच्या पुराने वेढा घातला. रविवारी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर सोमवारी पुराची पातळी वाढली. गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित जागेचा आधार घेतला. चामोर्शी तालुका मुख्यालयाशी मार्र्कंडादेव गावाचा रविवारपासूनच संपर्क तुटला होता.

सरपटणारे प्राणी व वन्यजीवांची वस्तीकडे धाव
वैनगंगा नदी गोसेखुर्दच्या पाण्याने फुगल्याने उपनद्यांवर पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पाण्यासोबत सरपटणारे प्राणी, वन्यजीव वाहून येत आहेत. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी ते लोकवस्तीत शिरत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी व प्राण्यांना न घाबरता वन्यजीव प्रेमींशी संपर्क साधावा, असे सर्पमित्र अजय कुकडकर, दैवत बोदिले, पंकज फरकाडे आदींनी कळविले आहे.

चिखलगावातील जनावरे विर्शी वॉर्डात
वैनगंगा नदीचे पाणी वाढल्याने चिखलगाव येथील अनेक नागरिकांनी आपली जनावरे देसाईगंज येथील विर्शी वॉर्डात आणून बांधली.
 

Web Title: The flood situation persisted for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर