शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

पुराच्या पाण्याने भामरागड जलमय, 300 कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 5:36 PM

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हे तालुका मुख्यालयाचे गाव पुराच्या पाण्यामुळे जलमय झाले आहे.

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हे तालुका मुख्यालयाचे गाव पुराच्या पाण्यामुळे जलमय झाले आहे. सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहात असलेल्या पर्लकोटा नदीला गेल्या 15 दिवसांत तिस:यांदा पूर येऊन पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले. बुधवारी सकाळपासून गावाच्या दिशेने पुढे सरकत असलेल्या पुराच्या पाण्याने गुरूवारी सकाळी 150 पेक्षा जास्त घरे व दुकानांना वेढा दिला. याशिवाय 200 कुटुंबियांच्या जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने हाह:कार उडाला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्परता दाखवत जवळपास 300 कुटुंबियांना उंच भागातील घरे,  तहसील कार्यालयाचे सभागृह आणि गावातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात हलवून गरजेनुसार त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली आहे. पाणी कमी होण्याच्या आशेने घरातच थांबून अडकून पडलेल्या अनेक लोकांसह त्यांच्या घरातील साहित्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मोटरबोट व डोंग्याने पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. गावातील गरोदर महिलांना आधीच हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात आणि ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याशिवाय भामरागडमध्येही पुरेसा औषधीसाठा असून तालुका आरोग्य अधिका:यासह सर्व चमू गावातच आहे. तहसीलदार कैलास अंडील गडचिरोलीत गेल्यानंतर पूर चढल्याने ते अलिकडेच अडकून पडले आहेत. परंतू सर्व परिस्थितीवर नजर ठेवून ते सर्वाना सूचना करत आहेत. गावात नायब तहसीलदार निखिल सोनवाने, हेमंत कोकोडे तसेच ठाणोदार संदीप बांड व इतर कर्मचारी परिस्थिती हाताळत आहेत.

इंद्रवतीने ओलांडली धोक्याची पातळीगुरूवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार 24 तासात भामरागडमध्ये 120 मिमी पाऊस झाला आहे. तीन नद्यांच्या संगमावर वसलेल्या भामरागडला यावेळी छत्तीसगडकडून येणा:या इंद्रावती नदीच्या पुरामुळे मोठा फटका बसला आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीच्या प्रवाहामुळे पर्लकोटा नदीचे पाणी संगमावर अडल्या जाऊन ते पाणी गावात शिरले आहे. 

तालुक्यात सर्व शाळांना सुटीभामरागडप्रमाणो इतर अनेक गावांचा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार कैलास अंडील यांनी दिली. नागरिकांच्या मदतीसाठी महसूल विभागासह शिक्षकांची आणि नगर पंचायतच्या कर्मचा:यांचीही मदत घेतली जात आहे. संपर्कासाठी मोबाईल नेटवर्क आणि वीज पुरवठा सुरू राहण्याकडेही प्रशासनाचे कटाक्षाने लक्ष आले. 

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण इंद्रावती नदीची पाणीपातळी वाढल्यास परिस्थिती बिघडू शकते. गरज पडल्यास एनडीआरएफची टीम बोलविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन घेईल. पोलीस आणि महसूल विभागाकडे असलेल्या सॅटेलाईट फोनने संपर्क ठेवून योग्य त्या सूचना केल्या जात आहेत. पूरग्रस्तांची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी विविध विभागांचे जवळपास 100 कर्मचारी कार्यरत आहेत.- कैलास अंडीलतहसीलदार, भामरागड

टॅग्स :floodपूरGadchiroliगडचिरोली