पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ज्योत आरमोरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:43 IST2017-09-22T00:43:11+5:302017-09-22T00:43:23+5:30
आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरातील दुर्गा माता मंडपात पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातील ज्योत आणण्यात आली असून गुरूवारी दुपारी ३ वाजता या ज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ज्योत आरमोरीत
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी येथील जुन्या बसस्थानक परिसरातील दुर्गा माता मंडपात पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातील ज्योत आणण्यात आली असून गुरूवारी दुपारी ३ वाजता या ज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
आरमोरी येथील दुर्गा उत्सव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. देशभरातील प्रसिध्द धार्मिक ठिकाणांच्या या ठिकाणी प्रतिकृती तयार केल्या जातात. जुन्या बसस्थानकाजवळील दुर्गा माता मंडळांने यावर्षी महाराष्टÑातील प्रसिध्द देवस्थान पंढरपूरचा देखावा तयार केला आहे. ज्या ठिकाणचा देखावा असेल त्याच ठिकाणची ज्योत आणण्याची परंपरा जोपासली जात आहे. या अंतर्गत यावर्षी पंढरपूर येथील ज्योत विठ्ठल-रखुमाईच्या आणण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात गुरूवारी आरमोरी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी उसळणार गर्दी
पंढरपूर येथील विठ्ठलाचे देवस्थान हे महाराष्टÑाचे आराध्यदैवत मानल्या जाते. आषाढी एकादशी व कार्तिक महिन्यात जिल्ह्यातील अनेक भाविक नित्यनेमाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. ज्यांना दरवर्षी जाण्याचे भाग्य लाभत नाही. असे नागरिक आयुष्यात किमान एकदा तरी विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस बाळगतात. मात्र आयुष्यात एकदाही पंढरपूरला न जाऊ शकणाºया भाविकाची आस अधुरी राहते. आरमोरी येथील दुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी पंढरपूरचा देखावा निर्माण केला आहे. जे भाविक पंढरपूरला जाऊन प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकले नाही, अशा भाविकांची मनोकामना आरमोरी येथील विठ्ठलाचे प्रतिकात्मक मंदिर बघून पूर्ण होणार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची गर्दी उसळणार आहे.