कोल्हापूर येथून आणणार आरमोरीत ज्योत
By Admin | Updated: October 10, 2015 01:42 IST2015-10-10T01:42:45+5:302015-10-10T01:42:45+5:30
शहरातील बसस्थानक परिसरात नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली जाणार असून

कोल्हापूर येथून आणणार आरमोरीत ज्योत
आरमोरी : शहरातील बसस्थानक परिसरात नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली जाणार असून यावर्षी या ठिकाणी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरातून ज्योत आणली जाणार आहे. सदर ज्योत आणण्यासाठी भाविक आरमोरी येथून गुरूवारी रवाना झाले आहेत.
नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी देशातील प्रसिध्द असलेल्या धार्मिक स्थळांवरची ज्योत आणली जाते. बहुतांश भाविक प्रत्येकच धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे तेथील ज्योत आणून दुर्गामातेजवळ ठेवली जाते. दुर्गामातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक या ज्योतीचेही दर्शन घेतात. यावर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातून ज्योत आणली जाणार आहे. ज्योत आणण्यासाठी पंकज खरवडे, यादव धकाते, अमोल निखारे, मनोज सोरते, शंकर धकाते, डाकराम कांबळे आदी भाविक कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
तत्पूर्वी आरमोरी येथील नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्योत आणण्यासाठी जात असलेल्या वाहनाचे मन्नु मोटवानी यांच्या हस्ते विधिवत पूजन केले. यावेळी नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी बापू पप्पुलवार, अंकुश खरवडे, नंदू नाकतोडे, अमर खरवडे, भारत बावणथडे, गौरव खरवडे, धात्रक, रूपेश गजपुरे, विलास चिलबुले, अमर मेश्राम यांच्यासह भाविक उपस्थित होते. सदर ज्योत १३ आॅक्टोबर रोजी ९ वाजता आरमोरी शहरात येणार आहे. (प्रतिनिधी)