आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनतर्फे ध्वजाराेहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:19+5:302021-08-12T04:41:19+5:30

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हलबा हलबी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष ...

Flag hoisting by the Tribal Employees Federation | आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनतर्फे ध्वजाराेहण

आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनतर्फे ध्वजाराेहण

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हलबा हलबी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष फरेंद्र कुत्तीरकर, हलबा हलबी समाज संघटनेचे माधवराव गावळ, नगरसेवक गुलाबराव मडावी, सुरेश किरंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर, आनंद कंगाले, डॉ. हेमराज मसराम, जयश्री येरमे आदी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन अमरसिंह गेडाम यांनी केले.

गोंडी गीताद्वारे सलामी देण्यात आली. त्यानंतर त्याच ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जागतिक आदिवासी दिवस व आदिवासींचे हक्क, अधिकार आणि आदिवासी संस्कृती याविषयी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मनीषा मडावी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध संघटनाच्या वतीने गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी राजेश्वर पदा, ऋषी होळी, मुकेश पदा, अमरसिंग गेडाम, चंद्रकुमार उसेंडी, नामदेव उसेंडी, वसंत कोरेटी, सुरेश नाईक, सूरज मडावी, विनायक कोडापे, बाजीराव वडे, राम मडावी, डंबाजी पेंदाम यांनी सहकार्य केले.

Web Title: Flag hoisting by the Tribal Employees Federation