मुद्रा लोनचे प्रकरण तत्काळ मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:09 IST2018-02-11T01:08:57+5:302018-02-11T01:09:59+5:30
केंद्र शासनाने बेरोजगार युवक व युवतींना रोजगार देण्यासाठी मुद्रा लोन योजना कार्यान्वित केली. या योजनेचा अधिकाधिक बेरोजगारांना लाभ मिळण्यासाठी भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

मुद्रा लोनचे प्रकरण तत्काळ मार्गी लावा
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : केंद्र शासनाने बेरोजगार युवक व युवतींना रोजगार देण्यासाठी मुद्रा लोन योजना कार्यान्वित केली. या योजनेचा अधिकाधिक बेरोजगारांना लाभ मिळण्यासाठी भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मुद्रा लोनचे प्रस्तावित प्रकरण तत्काळ मार्गी लावावे, असे प्रतिपादन जिल्हा मुद्रा लोन समितीच्या सदस्य तथा भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी रेखा डोळस यांनी केले.
स्थानिक सर्कीट हाऊसमध्ये मुद्रा लोनबाबत भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हा महामंत्री जावेद अली, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रहिमा सिध्दीकी, शहर अध्यक्ष सलीम शेख आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात एकही बेरोजगार रिकाम्या हाताने राहता कामा नये, असे सांगत सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन डोळस यांनी केले.