लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्या पथकाने मुरूमाची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी वाहन जप्त केले. सदर कारवाई शनिवार अंबेला परिसरात केली.मुलचेरा ते अंबेला या रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मुरूम टाकले जात आहे. शनिवारी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी अचानक भेट दिली असता, मुरूमाची चोरी होत असल्याचे दिसून आले. याबाबतची सूचना दिल्यानंतर नायब तहसीलदार आर. व्ही. तलांडे व तलाठी कमलेश कलगटवार, कोतवाल धम्मदीप खोब्रागडे यांच्या पथकाने कारवाई करून पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त केला. तीन ट्रॅक्टरला क्रमांकच लिहिले नव्हते. तर एमएच ३३-३८०८ क्रमांकाची जेसीबी तसेच एमएच ३३ एफ ४५४३, एमएच ३३ एफ ३४६९ या क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टरचा समावेश आहे. प्रत्येक ट्रॅक्टरवर जवळपास १ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर अवैध मुरूम टाकला जात असतानाहीतहसीलदार व तलाठी यांचे दुर्लक्ष होत होते. विशेष म्हणजे, मुलचेरा तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नाही. याचा गैरफायदा रेती व मुरूम तस्कर उचलतात. सुटीच्या दिवशी तलाठी व इतर कर्मचारी येत नसल्याची पक्की माहिती तस्करांना राहत असल्याने सुटीच्या दिवशीच रेती व मुरूमाची चोरी केली जाते. सर्व तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी होत आहे.ज्या ठिकाणावरून मुरूम चोरले जात होते, त्या ठिकाणी जवळपास ५०० ब्रास मुरूमाची चोरी झाल्याचे दिसून येते. सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात मुरूमाची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 19:22 IST
उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्या पथकाने मुरूमाची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी वाहन जप्त केले. सदर कारवाई शनिवार अंबेला परिसरात केली.
गडचिरोली जिल्ह्यात मुरूमाची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त
ठळक मुद्देमुलचेरा ते अंबेला रस्त्याच्या कामासाठी वापरएसडीओंची कारवाई