शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पाच हजारांवर घरांची पावसामुळे पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:00 AM

यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्दे२१ जण वाहून गेले : सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात पावसाने हाह:कार उडवल्याने सर्वच तालुक्यांत वारंवार अतिवृष्टी झाली. त्यातही अहेरी उपविभागात येणाऱ्या भामरागडसह इतर तालुक्यांमध्ये पावसामुळे बरीच हाणी झाली आहे. नुकसानाचा अंदाज घेणाऱ्या सर्व्हेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात असून पडझड झालेल्या घरांचा आकडा ५ हजारांच्या घरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे वारंवार नदी व नाल्यांना आलेल्या पुरांमुळे आतापर्यंत २१ जणांना जीव गमवावा लागला. त्यातील ५ जणांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत.पावसाळ्याचे अजून १० दिवस शिल्लक असले तरी आतापर्यंत वार्षिक सरासरीपेक्षा बराच जास्त म्हणजे १८२८ मिमी पाऊस बरसला आहे. सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात झाला. त्यामुळे या तालुक्यात जीवित आणि वित्तहाणीचे प्रमाणही जास्त आहे.भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीला येणाऱ्या पुरामुळे तालुका मुख्यालयासह काही गावांचा संपर्क तुटतो. तसेच अनेक गावांमध्ये जाण्यासाठी छोटे नाले ओलांडून जावे लागते. परंतू सततच्या पावसामुळे हे नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने गावकऱ्यांची चांगलीच अडचण झाली. त्या नाल्यातून किंवा त्यावरील ठेंगण्या पुलावरून पैलतीर गाठण्याच्या प्रयत्नात भामरागड तालुक्यात ९ जणांना बळी जावे लागले. त्यातील २ जणांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले.जीवित हाणीत सर्वाधिक ९ जण भामरागड तालुक्यातील, तर ४ जण अहेरी तालुक्यातील आहेत. याशिवाय गडचिरोली व आरमोरी तालुक्यात प्रत्येकी २, तर चामोर्शी, मुलचेरा, कुरखेडा व कोरची तालुक्यात प्रत्येकी एक जण पुरात वाहून गेला. पुराच्या पाण्यात शिरून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात हे सर्वजण वाहून गेले.पूरपरिस्थितीचा फटका मुक्य प्राण्यांनाही बसला. आतापर्यंत ५९४ जवानरांना जीव गमवावा लागला.मदत वाटपाचे काम होणार आता वेगानेपावसाने थोडी उसंत घेताच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणासाठी पाठविलेल्या इतर तालुक्यातील अतिरिक्त मनुष्यबळामुळे भामरागड तालुक्यात नुकसानाचे पंचनामे करण्याचे आव्हानात्मक काम आता पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे लवकरच त्या सर्व नुकसानग्रस्तांना रोख स्वरूपात मदत वाटपाचे काम सुरू होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले.योग्य व्यवस्थापनामुळे जीवितहानी टळलीवारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागडसोबत एटापल्ली, अहेरी, आरमोरी, गडचिरोली व इतरही तालुक्यांमध्ये अनेक जण पुरात अडकून पडले होते. त्या सर्वांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी वेळीच आपल्या पथकांना तिथे पाठवून त्यांचा जीव वाचवला. या अधिकाऱ्यांनी अहोरात्र काम करून कमीत कमी नुकसान होण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत पूरग्रस्तांना आश्रय देण्यासाठीही धावपळ केली. त्यामुळे संभावित जीवित हाणी टाळण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले. आता नागरिकांकडून प्राप्त मदत वाटपाचे काम सुरू आहे.

टॅग्स :Rainपाऊस