पाच टक्के गर्भवती मातांचे झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:57+5:302021-07-21T04:24:57+5:30
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाची माेहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. यात १८ वर्षांवरील महिला व पुरुषांनी सहभाग घेतला आहे. ...

पाच टक्के गर्भवती मातांचे झाले लसीकरण
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाची माेहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. यात १८ वर्षांवरील महिला व पुरुषांनी सहभाग घेतला आहे. गडचिराेली शहरात चार ठिकाणी काेराेना प्रतिबंधक लसीकरण केंद्र आहेत. शहरासह जिल्हाभरात मिळून आतापर्यंत जवळपास पाच टक्के गर्भवती महिलांनी काेराेनाचा डाेस घेतला आहे.
काेराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर त्यापासून बचाव व्हावा, याकरिता काेणत्याहीप्रकारची ठाेस उपाययाेजना केंद्र अथवा राज्य शासनाकडे नव्हती. परिणामी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वेळाेवेळी वापर करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या हाेत्या. काेराेनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाई केली जात हाेती. कालांतराने लस उपलब्ध झाल्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी पुढे येऊ लागले.
सुरुवातीला काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत ग्रामीण व दुर्गम भागात अनेक गैरसमज हाेते. लस घेतल्यानंतर ती शरीरात काही दिवसांनी परिणाम दाखवत हाेती. दरम्यान, हलकासा ताप येणे, डाेळेे जळजळ करणे, अंगदुखी आदींचा त्रास दाेन ते तीन दिवस राहात हाेता; मात्र हा सर्व त्रास लस घेतलेल्या सर्व नागरिकांना हाेत नव्हता. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची राेगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्यांना हा त्रास झाला नाही. उलट शहरी भागातील लाेकांना अंगदुखी, ताप येणे आदी प्रकार दिसून आले.
गर्भवती मातांनी लस घ्यावी, यासाठी शासनाच्यावतीने मान्यता देण्यात आली. त्याअनुषंगाने प्रशासकीय व आराेग्य यंत्रणेला प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात गर्भवती मातांना काेराेनाची लस दिली जात आहे. मात्र याची वेगळी नाेंद सध्या तरी केली जात नसल्याचे दिसून येते.
काेट...
न घाबरता घ्या लस
काेराेनाची तिसरी लाट राेखण्यासाठी आराेग्य यंत्रणेच्यावतीने कसाेशीने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करून घेतले जात आहे. लसीकरणाबाबत गर्भवती मातांचे समुपदेशन करण्यात आले. काेराेना प्रतिबंधक लसीचा गर्भवती मातेला काेणताही दुष्परिणाम हाेत नाही. शिवाय धाेकेही नाहीत. गडचिराेली जिल्ह्यात लसीकरणासाठी गर्भवती माता आता पुढे येत आहेत. ८ जुलैपासून त्यांचे लसीकरण सुरू झाले असून, जिल्हाभरात जवळपास पाच टक्के गर्भवती मातांनी काेराेना प्रतिबंधात्मक डाेस घेतला आहे.
- डाॅ. समीर बन्साेडे,
जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी, गडचिराेली
.............
काेराेनाचा प्रादुर्भाव हाेऊ नये, यासाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. याची पूर्ण कल्पना मला आहे. मात्र पाेटात बाळ असल्यामुळे त्याला धाेका हाेऊ नये, याकरिता काेराेना प्रतिबंधक लस घेण्याची माझी सध्या तरी हिंमत हाेत नाही. चार ते पाच दिवसांनंतर लस घेण्यासाठी मी लसीकरण केंद्रावर जाणार आहे.
- गर्भवती स्त्री
................
काेराेनाची लागण हाेऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. काेराेनापासून बचाव करण्याकरिता लसीकरण हा चांगला उपाय आहे. आराेग्याच्या दृष्टीने लस घेणे हे महत्त्वाचे आहे. मात्र माझ्या बाळाला काही धाेका तर हाेणार नाही ना, अशा भीतीने मी अजूनही लस घेतली नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबियांच्या परवानगीनंतर लस घेऊ.
- गर्भवती स्त्री
बाॅक्स...
अनेकांना आहे दुसऱ्या डाेसची प्रतीक्षा
- १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर अनेक युवक व ३० ते ४० वर्षे वयाेगटातील नागरिकांनी नाेंदणी करून काेराेनाची प्रतिबंधात्मक लस घेतली. पहिला डाेस घेऊन दाेन महिने उलटले, तरी दुसरा डाेस मिळाली नाही. या डाेसची प्रतीक्षा कायम आहे.