तेलंगण पोलिसांच्या चौकशीत पाच जणांची नावे निष्पन्न

By Admin | Updated: February 25, 2016 01:20 IST2016-02-25T01:20:39+5:302016-02-25T01:20:39+5:30

रविवारी गोदावरील नदीच्या पात्रात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील वंशीचा चवथ्या दिवशीही शोध लागला नाही.

Five people have been named in the probe in Telangana police | तेलंगण पोलिसांच्या चौकशीत पाच जणांची नावे निष्पन्न

तेलंगण पोलिसांच्या चौकशीत पाच जणांची नावे निष्पन्न

दोन दुचाकी सापडली : संयुक्त शोधकार्य सुरूच
सिरोंचा : रविवारी गोदावरील नदीच्या पात्रात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील वंशीचा चवथ्या दिवशीही शोध लागला नाही. मात्र बुधवारी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकी वाहने शोधकार्य पथकाला आढळून आले. तेलंगणा पोलिसांनी बोटेतून प्रवास करणाऱ्या आणखी प्रवाशांची नावे चौकशीतून समोर आणली आहे.
रविवारी या बोटेतून पार्वती अशोक सिडाम, कमला रामसाई आलाम, शशिकला रमेश पोरतेटी, शंकर ताटीकोंडावार, अरूण शामला हे सर्व तेलंगण येथील रहिवासी असलेले हे सर्व लोक मिरची तोडण्याच्या कामासाठी येथे आले होते. बुडालेल्या बोटेतून ते प्रवास करीत होते. मात्र ते सुरक्षित व जिवंत असल्याचे तेलंगणा पोलिसांनी चौकशीतून स्पष्ट केले आहे.
बुधवारी दोन्ही राज्याच्या संयुक्त शोधकार्य पथकाला सायंकाळी ५ वाजता विना क्रमांकाची पहिली तर ६.१५ वाजताच्या सुमारास दुसरी दुचाकी मिळाली. मात्र वंशीचा शोध चौथ्या दिवशीही लागला नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Five people have been named in the probe in Telangana police