नक्षली बॅनरमुळे पाच तास वाहतूक ठप्प
By Admin | Updated: May 21, 2015 01:41 IST2015-05-21T01:41:11+5:302015-05-21T01:41:11+5:30
एटापल्ली तालुक्याच्या बुर्गी भागात उडेरा जंगल परिसरात चकमकीदरम्यान पोलिसांनी आदिवासी महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी ...

नक्षली बॅनरमुळे पाच तास वाहतूक ठप्प
आलापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या बुर्गी भागात उडेरा जंगल परिसरात चकमकीदरम्यान पोलिसांनी आदिवासी महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आलापल्ली - भामरागड मार्गावर १८ मे रोजी सोमवारी बॅनर बांधला होता. त्यामुळे जवळजवळ पाच तास वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीतून प्रवास करणाऱ्या शेकडो नागरिकांना भर उन्हात जंगलात दिवस काढावा लागला. या भागात वाहतूकही ठप्प झाली होती. अनेक प्रवासी बस बाहेर येऊन जंगलात झाडाखाली सावली शोधत बसलेले होते. मुख्य मार्गावरच हा फलक लावण्यात आल्याने कोणत्याही वाहनचालकाने बॅनर ओलांडून वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक प्रवाशांना महत्त्वाचे काम असतानाही बस पुढे न गेल्यामुळे जंगलातच रखडून रहावे लागले. (वार्ताहर)