बिबट्याचे चामडे विकणाऱ्या पाच आराेपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:26+5:302021-04-18T04:36:26+5:30

आरमोरी शहरात काहींनी मृत बिबट्या वन्यप्राण्यांची चामडे व नखे विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवली असल्याची माहिती ...

Five accused of selling leopard skins arrested | बिबट्याचे चामडे विकणाऱ्या पाच आराेपींना अटक

बिबट्याचे चामडे विकणाऱ्या पाच आराेपींना अटक

आरमोरी शहरात काहींनी मृत बिबट्या वन्यप्राण्यांची चामडे व नखे विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवीत तोतया ग्राहक पाठवून विक्रीत सहभागी असलेल्या यशवंत सोनबाजी निखारे, सुभाष पंढरी धकाते, विश्राम शंकर रामटेके, सुदाम पांडुरंग कांबळे व ईश्वर विस्तारी सोरते सर्व राहणार आरमोरी या पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बिबट्याचे चामडे व नखे हस्तगत करुन जप्त करण्यात आली.

सदर प्रकरणातील पाचही आरोपींना शुक्रवारी १६ एप्रिलला आरमोरी येथील. न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक १९ एप्रिल पर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

घटनेतील मुख्य आरोपी कोण याचा तपास वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. या प्रकरणातील काही आरोपी फरार झाले असल्याची चर्चा आहे.

सदर कारवाई देसाईगंज उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, आर. बी. इनवते, आरमोरीचे क्षेत्र सहाय्यक आर. पी. कुंभारे, वनरक्षक एस. पी. तिजारे, बी. एन. शेंडे, एन. एम. तुमपल्लीवार,के. एस. गिन्नलवार, आर. बी. सहारे, पी .एच. करकाडे, श्रीकांत सेलोटे, कानकाटे यांनी केली. या प्रकरणात मुख्य आरोपीसह अनेक आरोपी सहभागी असल्याचा संशय असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

===Photopath===

170421\17gad_1_17042021_30.jpg

===Caption===

अटक करण्यात आलेल्या आराेपींसह वनविभागाचे कर्मचारी

Web Title: Five accused of selling leopard skins arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.