सागवान मालासह पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:39+5:30

बैलबंडीद्वारे सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. दरम्यान सिरोंचा ते मंडलापूर मार्गे वन कर्मचारी गस्त करीत असताना मंडलापूर गावाकडील रस्त्यावर काही बैलबंड्या आढळून आल्या. वन कर्मचाºयाच्या दुचाकीचा प्रकाश पाहून तेथील इसम शेतात लपून बसले. पाहणी केली असता, पाच बैलबंड्या आढळून आल्या. प्रत्येक बैलबंडीत साग लाकडाचे सहा ते सात नग आढळून आले. पाच बैलबंडीमध्ये एकूण ३४ सागवान नग जप्त करण्यात आले.

Five accused arrested with teak goods | सागवान मालासह पाच आरोपींना अटक

सागवान मालासह पाच आरोपींना अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे१ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त । सिरोंचात वन विभागाची धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ३४ सागवान लाकडासह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली. ही कारवाई २५ सप्टेंबर रोजी रात्री मंडलापूर गावानजीकच्या मार्गावर करण्यात आली.
बैलबंडीद्वारे सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. दरम्यान सिरोंचा ते मंडलापूर मार्गे वन कर्मचारी गस्त करीत असताना मंडलापूर गावाकडील रस्त्यावर काही बैलबंड्या आढळून आल्या. वन कर्मचाºयाच्या दुचाकीचा प्रकाश पाहून तेथील इसम शेतात लपून बसले. पाहणी केली असता, पाच बैलबंड्या आढळून आल्या. प्रत्येक बैलबंडीत साग लाकडाचे सहा ते सात नग आढळून आले. पाच बैलबंडीमध्ये एकूण ३४ सागवान नग जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून पाच आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये तिरूपती राजम पुल्लुरी, पोचम दुर्गया पुल्लुरी, मलया पोचम पुलगंटी, व्यंकटा समय्या आइला, तिरूपती पोचम गुंडेटी, सर्व रा. नगरम आदींचा समावेश आहे. बैलबंड्या व सागवान मिळून एकूण १ लाख ८९ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार, सहायक वनसंरक्षक एस. जी. बडेकर, क्षेत्र सहायक बी. एम. खोब्रागडे, एस. जे. खडतर यांच्यासह संरक्षण पथकातील वनपाल व इतर कर्मचाºयांनी केली.

Web Title: Five accused arrested with teak goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.