शेतकऱ्यांना मत्स्य बीज वाटप
By Admin | Updated: October 13, 2016 02:49 IST2016-10-13T02:49:35+5:302016-10-13T02:49:35+5:30
तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेराच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत

शेतकऱ्यांना मत्स्य बीज वाटप
शेततळ्यात प्रात्यक्षिक : मत्स्यपालनातून आर्थिक प्रगती करण्याचे आवाहन
मुलचेरा : तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेराच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुक्यातील बोलेपल्ली येथील निवडक शेतकऱ्यांच्या शेतातील शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन प्रात्यक्षिक राबविण्याकरिता मत्स्य बीज वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मत्स्यपालन व्यवसायाबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेततळ्यात रोहू, कतला, मृगळ आदी मत्स्य बीज सोडून प्रात्यक्षिक करण्यात आले.
कृषी विभागाच्या वतीने तालुक्यात मागेल त्याला शेततळे, नरेगा आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेततळ्याची निर्मिती करण्यात आली. यंदा चांगला पाऊस झाल्याने या शेततळ्यात जलसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी आत्मा अंतर्गत मत्स्य बीज वाटप करण्यात आले. यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवके, कृषी सहायक ए.एल. खेळकर, मारोती पल्लो, गणेश बंकावार, पुरण चांदेकर व गावातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)