अपयश यशाची पहिली पायरी
By Admin | Updated: February 1, 2016 01:36 IST2016-02-01T01:36:20+5:302016-02-01T01:36:20+5:30
स्नेहसंमेलनातील स्पर्धांमध्ये अपयश आल्यास विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्द व चिकाटीने परिश्रम घ्यावे.

अपयश यशाची पहिली पायरी
अशोक नेते यांचे प्रतिपादन : श्रीराम महाविद्यालयात रौप्य महोत्सव
कुरखेडा : स्नेहसंमेलनातील स्पर्धांमध्ये अपयश आल्यास विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्द व चिकाटीने परिश्रम घ्यावे. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
कुरखेडा येथील श्रीराम विद्यालय तथ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रौप्य महोत्सवी उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात खा. नेते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष वामनराव फाये होते. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, संस्थेचे सचिव दोषहर फाये, सहसचिव नागेश्वर फाये, हुंडीराज फाये, गुणवंत फाये, विमल फाये, वर्षा फाये, पं. स. सदस्य चांगदेव फाये, राम लांजेवार, रवींद्र गोटेफोडे, वर्षा लाटेलवार, विनोद चिलबुले, बबलू हुसैरी, अॅड. उमेश वालदे, रामहरी उगले, स्वाती नंदनवार, दीपाली देशमुख, अर्चना वालदे, नंदिनी दखणे, सेवानिवृत्त प्राचार्य दखणे, टेंभुर्णे, करुणाबुद्ध ज्योतीभंते, प्राचार्य गजभिये, पी. डब्ल्यू. भरणे, नंदू गोबाडे, मुकेश कापगते, साहिल गजभिये, मुकेश डोंगरवार, दीक्षा नंदेश्वर, शीतल मासुरकर, स्नेहा लाटूलवार उपस्थित होत्या.
कुरखेडा, कोरची या भागात शैक्षणिक संस्थेमुळे शिक्षणाची सोय उलपब्ध झाली आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. यावेळी वामनराव फाये यांनीही मार्गदर्शन केले. संचालन प्रा. प्रदीप पाटनकर तर आभार वलथरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)