शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

१० हजार बालकांचे पहिलीत पाऊल

By admin | Updated: June 26, 2016 01:08 IST

२७ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाभरातील ९ हजार ८२० विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत.

स्वागताची तयारी सुरू : ४ हजार ८७० विद्यार्थिनी; गळती थांबविण्याचे निर्देशगडचिरोली : २७ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाभरातील ९ हजार ८२० विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. लहान बालक बोलायला लागल्यानंतर जवळपास वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याला अंगणवाडीत दाखल केले जाते. अंगणवाडीत त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच शिक्षणाचे थोडेफार धडेही दिले जातात. मात्र प्रत्यक्षात शिक्षण पहिल्या वर्गापासूनच सुरूवात होते. शाळेमध्ये पहिल्यांदाच बालक जात असल्याने पालक वर्गामध्ये उत्सुकता राहते. प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर बैठका घेऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या गोळा केली आहे. यामध्ये चालू सत्रासाठी सुमारे ९ हजार ८२० विद्यार्थी दाखल होणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे ८६३ विद्यार्थी, अनुसूचित जमातीचे ४ हजार ४६६ विद्यार्थी, विमुक्त भटक्या जमातीचे १ हजार ४३, इतर मागास वर्गातील २ हजार ६९४, अल्पसंख्यांक समाजाचे ५२ विद्यार्थी व बिगर मागास प्रवर्गाचे ५०२ विद्यार्थी आहेत. दाखलपात्र एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलांची संख्या ४ हजार ९५० तर मुलींची संख्या ४ हजार ८७० एवढी आहे. उन्हाळाभर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेमध्ये दाखल केले आहे. शाळेमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गळती होणार नाही, याचीही खबरदारी शिक्षकांना घ्यावी लागणार आहे. गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (नगर प्रतिनिधी)८७५ शाळाबाह्य विद्यार्थी आढळलेशिक्षण विभागाच्या वतीने उन्हाळ्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये ८७५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. यामध्ये ४३२ मुले व ४४३ मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना त्या-त्या वर्गात दाखल केले जाणार आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ५२, आरमोरी ७, धानोरा ९४, चामोर्शी १२, अहेरी ६१, एटापल्ली १६७, सिरोंचा ११६, मुलचेरा ५, कोरची ३७, भामरागड २५६, देसाईगंज १६, कुरखेडा तालुक्यात ५२ विद्यार्थी आढळून आले. अधिकारी, पदाधिकारी करणार नवागतांचे स्वागतशाळेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून केले जाणार आहे. कोणत्या पदाधिकाऱ्याने कोणत्या शाळेमध्ये जावे, याचे नियोजन शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर सभा घेऊन केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी गावातून रॅलीसुध्दा काढण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.बेजूर शाळेतील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवादविद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम मुख्यमंत्री सुध्दा करणार आहेत. भामरागड तालुक्यातील बेजूर शाळेत एक ते पाच वर्ग आहेत. यामध्ये एकूण २९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील तीन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. सदर विद्यार्थी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सेंटरमधून मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत.