शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणी मुलमुले व पल्लवी किरमे जिल्ह्यात प्रथम

By admin | Updated: June 9, 2015 02:06 IST

गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची

जिल्ह्याचा निकाल ८६.२६ टक्के : १४ हजार ३३ विद्यार्थी उत्तीर्ण; १ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रावीण्य; २ हजार २३५ विद्यार्थी नापास
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीची रोहिणी प्रकाश मुलमुले व राणी दुर्गावती कन्या शाळा गडचिरोलीची पल्लवी मुकूंदा किरमे या दोन विद्यार्थिनी प्रथम आल्या आहेत. दोघीनाही ९६.६० टक्के गुण आहे.
जिल्ह्यातून १६ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नामांकन केले होते. १६ हजार २६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक हजार १२९ विद्यार्थी प्राविण्यासह ४ हजार ३८९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार ७१० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ८०५ विद्यार्थी साधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८६.२३ आहे. जिल्ह्यातून ९६.२० टक्के गुण घेऊन सेंट फ्रान्सीस हायस्कूल नागेपल्लीची संजना गुंडावार ही विद्यार्थिनी दुसरी आली आहे. तर ९६ टक्के गुण घेऊन प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल गडचिरोलीचा पियुष अलोणे व डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरीची श्रेया देविकार हे अनुक्रम तिसऱ्या स्थानावर आहेत. शिवाजी हायस्कूल गडचिरोलीचा अभिनव अरूण मुनघाटे हा ९५.८० टक्के गुण घेऊन चौथ्या स्थानावर आहे. तर याच शाळेची पूर्वा बुटे ही ९५.६० टक्के गुण घेऊन पाचव्या स्थानावर आहे. गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी शाळेचा देवांग सिडाम हा विद्यार्थी ९५.२० टक्के गुण घेऊन सहाव्या स्थानावर आहे. यंदा जिल्ह्यात २५ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल भगवंतराव हायस्कूल ठाकरी इल्लूर ता. चामोर्शीचा ४२.८५ टक्के लागला आहे. १०० टक्के निकालांच्या शाळांमध्ये सात खासगी अनुदानित व शासकीय अनुदानित आश्रमशाळांचाही समावेश आहे. यामध्ये गडचिरोली शहरातील दोन शाळांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ९१.५ टक्के निकाल भामरागड तालुक्याचा असून सर्वात कमी ८४.७ टक्के निकाल धानोरा तालुक्याचा आहे.

पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ६३.०७ टक्के
४गडचिरोली जिल्ह्यातून १ हजार ११७ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार ११३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी सहा विद्यार्थी पहिल्या श्रेणीत, ११ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून ७०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्याचा निकाल ६३.०७ टक्के लागला आहे.

निकालाच्या टक्केवारी मुलांची आघाडी
४गडचिरोली जिल्ह्यातून १४ हजार ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ७ हजार १६८ मुले व ६ हजार ८६५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच मुलांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ८५.२५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८७.३४ टक्के आहे. मुलींचे परीक्षेला बसण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढलेली आहे.