आगीत गुरांचा गोठा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 01:55 IST2017-02-18T01:55:38+5:302017-02-18T01:55:38+5:30
चोप येथील उमाजी उद्धव बावणे यांच्या राहत्या घराला लागून असलेल्या गोठ्याला शुक्रवारी सायंकाळी

आगीत गुरांचा गोठा जळून खाक
७० हजार रूपयांचे नुकसान : तीन शेळ्याही जखमी
कोरेगाव/चोप : चोप येथील उमाजी उद्धव बावणे यांच्या राहत्या घराला लागून असलेल्या गोठ्याला शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तीन शेळ्या जखमी झाल्या. दोन सायकल व जीवनाश्यक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे ७० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
उमाजी बावणे व त्यांच्या पत्नी कामानिमित्त शेतावर गेल्या होत्या. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या गोठ्यातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. शेजारी व गावकऱ्यांनी तत्काळ पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे दुसऱ्या घरांना आग लागली नाही. आगीबाबतची माहिती उपसरपंच कमलेश बारस्कर, गरीबदास बाटबर्वे यांच्या माहितीनंतर तलाठी आर. आर. रामटेके व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उईके घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. (वार्ताहर)