नवीन अरततोंडी येथे घराला आग
By Admin | Updated: May 22, 2015 01:40 IST2015-05-22T01:40:48+5:302015-05-22T01:40:48+5:30
देसाईगंज तालुक्यातील नवीन अरततोंडी येथील एका घराला आग लागून एक लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.

नवीन अरततोंडी येथे घराला आग
मोहटोला (किन्हाळा) : देसाईगंज तालुक्यातील नवीन अरततोंडी येथील एका घराला आग लागून एक लाख रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. सदर घटना बुधवारी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
अरततोंडी येथील संतोष उरकुडे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील धान्य, कपडे व साहित्य जळून खाक झाले. आग लागताच ग्रामस्थ घटनास्थळावर जमा झाले. त्यांनी पाणी ओतून आग विझविली. या आगीत घरात एका डब्यात ठेवलेले २५ हजार रूपयेही जळून खाक झाले. आग लागताच देसाईगंज नगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला माहिती देण्यात आली होती. परंतु ते येईपर्यंत नागरिकांनीच आग आटोक्यात आणली. घटनेतील नुकसानीचा पंचनामा तहसीलदार धाईत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. या आगीत उरकुडे यांचे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सदर कुटुंबाला तत्काळ प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी अरततोंडीवासीयांनी केली आहे. सर्व साहित्य जळाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. (वार्ताहर)