दिभना जंगल परिसरात आग
By Admin | Updated: May 13, 2017 02:07 IST2017-05-13T02:07:38+5:302017-05-13T02:07:38+5:30
तालुक्यातील दिभना जंगल परिसरात अनेक ठिकाणी आगी लागल्याने बहुतांश जंगल जळून खाक झाले आहे.

दिभना जंगल परिसरात आग
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील दिभना जंगल परिसरात अनेक ठिकाणी आगी लागल्याने बहुतांश जंगल जळून खाक झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लहान वनस्पतीही नष्ट झाल्या आहेत.
दिभना जंगलात झुडपी वनांचा समावेश आहे. परंतु मागील आठवडाभरापासून बहुतांश ठिकाणी आगी लागल्या आहेत. विशेषत: शेती परिसरातील जंगल जळालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कचरा जाळल्याने आग जंगलात पसरली. त्यामुळे जंगलातील रोपटे तसेच लाकडेही जळाली आहेत. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असून वन विभागाने योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.