आष्टीत गोदामाला आग

By Admin | Updated: December 18, 2014 22:53 IST2014-12-18T22:53:30+5:302014-12-18T22:53:30+5:30

आष्टी-अहेरी मार्गावरील अनिल अरमडलावार यांचे मालकीचे दुमजली गोदामाला आग लागून कोटी रूपयाचा माल आगीत जळून खाक झाला. सदर घटना गुरूवारच्या पहाटे घडली.

Fire in the devoted godown | आष्टीत गोदामाला आग

आष्टीत गोदामाला आग

अहेरी मार्गावर : बल्लारपूर, गडचिरोली, राजुरावरून पोहोचले अग्निशामक बंब
ंआष्टी : आष्टी-अहेरी मार्गावरील अनिल अरमडलावार यांचे मालकीचे दुमजली गोदामाला आग लागून कोटी रूपयाचा माल आगीत जळून खाक झाला. सदर घटना गुरूवारच्या पहाटे घडली.
अनिल अरमडलावार हे तेल, बिस्कीट, निरमा, सुपारी, चुना, पॅराशूट आदी मालाचे ठोक विक्रेते होते. परिसरातील अनेक गावात माल त्यांच्याकडून जातो. गोडावूनमधील सर्व खोल्यांमध्ये माल भरून होता. रात्री ११ वाजता शॉटसर्कीटने आग लागली व ही आग सर्व खोल्यांमध्ये पसरली. पहाटे ४ वाजता व्हेंटीलेटरमधून धूर निघताना नागरिकांना दिसला. लगेच ५ वाजता फिरायला जाणाऱ्या नागरिकांची या भागात गर्दी जमू लागली व त्यानंतर अनिल अरमडलावार यांना आगीची माहिती मिळाली. नागरिक व शेजाऱ्यांनी पाण्याचे पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणने शक्य नव्हते. दरम्यान गडचिरोली येथील अग्नीशामक दलाच्या वाहनाला बोलाविण्यात आले. सकाळी ७.३० वाजता हे वाहन पोहोचल्यावर आग विझविण्याच्या कामाला गती देण्यात आली. समोरच्या खोलीतील आग विझविण्याचा प्रयत्न होत असताना मागच्या खोलीमधील तेलाच्या बॉक्सने पेट घेतला व आगीच्या ज्वाला खिडकीमधून निघत होत्या. गोडावूनच्या मागच्या रूममध्ये जाण्यासाठी समोरून मार्ग असल्याने समोरची आग विझेपर्यंत मागील भागात आग विझविता आली नाही. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने मागील भिंत फोडून पाण्याचा मारा करण्यात आला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता बल्लारपूर नगर पालिकेचे अग्नीशामन वाहन पोहोचले व दोनही बाजुने पाण्याचा मारा सुरू झाला. राजुरा नगर पालिकेचाही बंब या कामी पोहोचला. आग ऐवढी भयानक होती की, गोडावूनच्या भिंतीला व स्लॅबला मोठ्या तडा गेल्या आहे. ८ तास आग विझविण्याचे काम अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी केले.

Web Title: Fire in the devoted godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.