आलापल्ली येथे आग दोन दुकान जळाली
By Admin | Updated: May 9, 2015 01:43 IST2015-05-09T01:43:54+5:302015-05-09T01:43:54+5:30
येथील बसस्थानकामागील असलेल्या बाजारचाळीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली.

आलापल्ली येथे आग दोन दुकान जळाली
आलापल्ली : येथील बसस्थानकामागील असलेल्या बाजारचाळीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. यामुळे दुकानमालकांचे सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले.
अहेरी तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या आलापल्ली येथील बसस्थानकामागील भागात असलेल्या बाजारचाळीत दुकाने आहेत. त्यातील खुल्या जागेवर झाडेझुडपे व कचरा आहे. पहाटेच्या सुमारास या कचऱ्याला आग लागून ती दुकानांपर्यंत पोहचली. यामुळे अजय चव्हाण यांच्या कापडी बॅगचे व नारायण बंदुकवार यांचे सलून ही दोन्ही दुकाने जळून खाक झाली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)