सकस चाऱ्याचे प्रशिक्षण

By Admin | Updated: November 24, 2014 22:58 IST2014-11-24T22:58:32+5:302014-11-24T22:58:32+5:30

आत्मा, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वसा येथे शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण हायड्रोपोनिक तंत्राद्वारे हिरवा चारा लागवड व अझोला निर्मितीचे

Fine Fine Training | सकस चाऱ्याचे प्रशिक्षण

सकस चाऱ्याचे प्रशिक्षण

गडचिरोली : आत्मा, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वसा येथे शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण हायड्रोपोनिक तंत्राद्वारे हिरवा चारा लागवड व अझोला निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत २२५ महिला व पुरूष सहभागी झाले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जि. प. चे वित्त व बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वडसाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून आत्माचे पोटे, कांता मिश्रा, बनकर, कृषी विज्ञान केंद्राच्या योगिता सानप, बँकेचे समन्वयक बेले, रूचा सावंत, जि. प. सदस्य उसेंडी, सरपंच झोडगे, पोलीस पाटील दहीकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अंबादे, भुसारी उपस्थित होते.
उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी वनविभागामार्फत चुल्हा विशेष जागृती अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानामुळे इंधनाची बचत होईल व महिलांच्या कष्टात बचत होईल, असे प्रतिपादन केले. यावेळी वसा येथील अंगणवाडी केंद्राला चुल्हा जाळी लावून देण्यात आली.
दूध संकलन, उद्योग तसेच चारा लागवडीच्या नवीन पद्धतीकरिता लागणारे फायबर ट्रे करिता दूध संकलन करणाऱ्या गावांमध्ये अधिकाधिक पशुपालकांना प्राधान्य देण्यात येईल, तसेच पुढील वर्षीच्या जि. प. बजेटमध्ये चारा व्यवस्थापन दूधाळ जनावरांच्या संख्येत वाढ, दूध संकलन केंद्र आदी विषयाला प्राधान्य देऊन स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांकरिता नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन गण्यारपवार यांनी दिले.
प्रशिक्षणात हायड्रोपोनिक चारा लागवड कमी जागेत करणे, कमी कालावधीत जास्त उत्पादन, पाण्याचा कमी वापर, कीड व रोगापासून मुक्त चारा उत्पादन, जनावरांसाठी रूचकर चारा निर्मिती आदी विषयांचा प्रकल्पात समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी हायड्रोपोनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या चारा ट्रेची पाहणी केली. प्रशिक्षण कार्यशाळेला वसा, आनंदनगर, वडसा, ब्रम्हपूरी, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा येथील दूध उत्पादक, शेतकरी, महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी मुक्त संचार गोठा, चारा व्यवस्थापन, अझोला उत्पादन व स्वच्छ दूध उत्पादन आदींचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. कार्यशाळेचे संचालन प्रविण काळबांधे तर आभार पुष्पा धानोरकर यांनी मानले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता तेजस्विनी दुग्ध व्यवसाय गटाच्या अध्यक्षा सिंधू समर्थ, पुष्पा धानोरकर, उत्तरा ठाकरे, देवका नरूले, गीता गुडी, सीएमआरसीच्या अध्यक्षा ज्योती म्हशाखेत्री, उपाध्यक्ष, सदस्य व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Fine Fine Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.