१० लाख रूपयांची आर्थिक मदत
By Admin | Updated: June 27, 2015 02:08 IST2015-06-27T02:08:37+5:302015-06-27T02:08:37+5:30
सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील तहसील कार्यालयात कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत ८ लाख २० हजारांची ...

१० लाख रूपयांची आर्थिक मदत
कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजना : गडचिरोली व चामोर्शी तहसील कार्यालयाचा पुढाकार
गडचिरोली/चामोर्शी : सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील तहसील कार्यालयात कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत ८ लाख २० हजारांची आर्थिक मदत २२ लाभार्थ्यांना तर चामोर्शी येथे गुरूवारी नऊ लाभार्थ्यांना एकूण १ लाख ८० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
गडचिरोली येथील कार्यक्रमाला आ. डॉ. देवराव होळी तहसीलदार डी. जी. जावध, जि. प. सदस्य छाया कुंभारे, श्रीकृष्ण कावनपुरे, गोवर्धन चव्हाण, नायब तहसीलदार एन. डी. भुरसे, स्वप्नील वरघंटे, ए. वाय. खोब्रागडे, नयना रामटेके, पुष्पा भुरसे, उर्मिला पुरी, रेखा पेंदाम, इंदू भोयर, शीला सोनुले, अर्चना गेडाम, कुसूम ठाकरे, सुंदरा भांडेकर, सकू घुटेवार, सया फुलझेले, वनिता निकुरे, गीता लटारे, चंद्रभागा रंदये, मंजुळा चंदनखेडे, लता लोनबले, मनिषा ठाकरे, हेमलता भुरसे, वनिता चरडुके, विमल घोनारे, रंजना अलाम, राधा चर्लेवार यांना प्रत्येकी २० हजार रूपये तर मुरखळा, नवेगाव येथील लता चौधरी यांचे पती श्रीराम चौधरी वीज पडून मृत्यूमुखी झाल्याने त्यांना चार लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला.
चामोर्शी येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत सुभाषग्रामच्या सविता देवनाथ, किष्टापूर येथील शोभा कस्तुरे, चामोर्शी येथील रेखा यारावार, मंजेगाव येथील गोपिका तुंकलवार, सोनापूर येथील अर्चना माहोरकर, वेलतुर तुकूम येथील छाया आत्राम, मुरखळा चक येथील मधूमाला धानोरकर, नवेगाव येथील दीपिका चौधरी, सोनापूर येथील गीता कोहळे यांना प्रत्येकी २० हजार रूपयांची आर्थिक मदत तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाला नायब तहसीलदार एस. के. बावणे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)