शिक्षक भारती संघटनेतर्फे दुधनांग कुटुंबाला आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:32 IST2021-02-08T04:32:21+5:302021-02-08T04:32:21+5:30
गडचिरोली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवणी येथील शिक्षक श्रावण दुधनांग यांचे २९ डिसेंबर २०२० ला आकस्मिक निधन झाले. ...

शिक्षक भारती संघटनेतर्फे दुधनांग कुटुंबाला आर्थिक मदत
गडचिरोली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवणी येथील शिक्षक श्रावण दुधनांग यांचे २९ डिसेंबर २०२० ला आकस्मिक निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. याबाबत माहिती मिळताच शिक्षक भारती (प्राथमिक) संघटनेतर्फे २५ हजार रुपयांची मदत गोळा करून ही मदत दुधनांग कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली. विशेष म्हणजे श्रावण दुधनांग यांच्या पत्नीचेसुद्धा दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. श्रावण दुधनांग हे कोरची तालुक्यातील देऊळभट्टी येथील मूळचे रहिवासी होते. दुधनांग हे वस्तीशाळा योजनेतून डीसीपीएसधारक असल्यामुळे त्यांना पेन्शन लागू नव्हती. मदत देताना जिल्हाध्यक्ष पी.वाय. देशमुख, अमरदीप भुरले, आर.एस. बिट्टीवार, हिराशिंग बोगा, तुळशीदास ठलाल, गोपाल कोरेटी, प्रकाश उइके, रघुपती मुरमाडे, रवींद्र गावंडे, गुरुदास सोमनकर, हेमंत दुर्गे, नीळकंठ तागडे उपस्थित होते.