पतसंस्थेची कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत होईल

By Admin | Updated: August 22, 2016 02:12 IST2016-08-22T02:12:42+5:302016-08-22T02:12:42+5:30

वनवैभव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बब्बूजी हकीम यांनी तीन संस्थांचा कारभार चालवून ही संस्था नावालौकीकास आणली.

Financial aid to the credit society employees | पतसंस्थेची कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत होईल

पतसंस्थेची कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत होईल

आष्टी येथे कार्यक्रम : धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन
आष्टी : वनवैभव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बब्बूजी हकीम यांनी तीन संस्थांचा कारभार चालवून ही संस्था नावालौकीकास आणली. या संस्थेच्या मार्फत निर्माण झालेल्या पतसंस्थेतून कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत होईल, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव अब्दुल हकीम होते. विशेष अतिथी म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, हसनअली गिलानी, संस्थेच्या उपाध्यक्ष चाचम्मा हकीम, अबुझमाड शिक्षण संस्थेचे सचिव समशेर पठाण, प्राचार्य लीना हकीम, छोटू भैय्या, आष्टीच्या सरपंच वर्षा देशमुख, अहेरी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, काशिनाथ भडके, मुख्याध्यापिका शेख, प्राचार्य शेख, संस्थेचे कार्यकारी अधिकारी बबलू हकीम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. नामदेव उसेंडी यांनी वनवैभव शिक्षण संस्थेने दुर्गम भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली व आता पतसंस्था निर्माण करून संस्थेच्या लौकीकात नव्याने भर पडणार आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष बबलू हकीम यांनी ही संस्था कर्मचाऱ्यांचे हीत सांभाळणारे असून या संस्थेत १ लाख ७० हजार रूपयांचे भांडवल कर्मचाऱ्यांनी उभे केले आहे, अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय फुलझेले, संचालन प्रा. डॉ. राज मुसने, आभार प्रा. रवी गजबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. भारत पांडे, प्रा. शास्त्रकार, प्रा. डॉ. गणेश खुणे, प्रा. कोरडे, राज लखमापुरे, राजू पोटवार आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला वनवैभव शिक्षण संस्थेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पतसंस्थेचे सभासद व कर्मचारी आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Financial aid to the credit society employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.