शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

अखेर जात पंचायतीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:21 AM

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : बलात्काऱ्यावर पोलीस कारवाई न करता दंड व गावजेवणाची शिक्षा देणाऱ्या जात पंचायतीच्या ६ सदस्यांवर अखेर पोलिसांनी जातपंचायत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यामुळे कायदा झुगारत आपण म्हणू तो कायदा अशी भूमिका घेणाऱ्या ठिकठिकाणच्या गावपंचायतींना चपराक बसली आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या जात पंचायतच्या सदस्यांमध्ये देवदास केशव पदा (६५), रोहीदास इसदू ...

ठळक मुद्देबलात्कारातील आरोपीला अभय प्रकरण : दंड व गावजेवणाची शिक्षा देऊन केले होते मोकळे

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : बलात्काऱ्यावर पोलीस कारवाई न करता दंड व गावजेवणाची शिक्षा देणाऱ्या जात पंचायतीच्या ६ सदस्यांवर अखेर पोलिसांनी जातपंचायत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यामुळे कायदा झुगारत आपण म्हणू तो कायदा अशी भूमिका घेणाऱ्या ठिकठिकाणच्या गावपंचायतींना चपराक बसली आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या जात पंचायतच्या सदस्यांमध्ये देवदास केशव पदा (६५), रोहीदास इसदू पदा (४२), खुशाल बागु पदा (४८), गजानन देवाजी मडावी (५८), सखाराम गणू हिचामी (७०) आणि यादव जेहाम हुर्रा सर्व रा.मोहली यांचा समावेश आहे. त्यांना मंगळवारी अटक करून गडचिरोली न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले.हे प्रकरण भूमकाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले होते. गेल्या १७ जानेवारी रोजी धानोरा तालुक्यातील मोहली गावात अनिल मडावी या ४० वर्षीय इसमाने जिल्हा परिषद शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाºया मुलीवर बलात्कार केला. मडावी याने पीडित मुलीच्या आईला बरे नसल्याचे निमित्त शिक्षकांना सांगून मुलीला शाळेतून गावाजवळच्या तलावात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात पंचायत बोलविण्यात आली. त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, माजी तंटामुक्त अध्यक्ष व इतरांनी अनिल मडावीला १२ हजार रूपये व गावकऱ्यांना जेवण देण्याचा दंड ठोठावला. मात्र सरपंच, उपसरपंच यासारख्या जबाबदार व्यक्तींनी याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली नाही. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असतानाही जात पंचायतीने कोणती मदत केली नसल्याचे भूमकाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गावात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर आढळले होते. त्यांनी नंतर पोलीस पाटील नलचुलवार यांच्याशी संपर्क साधला व नंतर मुलीच्या आई-वडिलांनी याबाबतची तक्रार २४ जानेवारी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. मात्र एफआयआरमध्ये जात पंचायतीने दिलेल्या दंडात्मक शिक्षेचा उल्लेख करण्यात आला नाही.अशा प्रकरणात पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याबरोबरच जात पंचायतीच्या अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी महिला, आदिवासी मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भूमकाल संघटनेच्या डॉ. रश्मी पारसकर व प्रा.दीपाली मेश्राम यांनी गडचिरोलीत पत्रपरिषदेतून केली होती. आरोपीला १२ हजार रूपये दंड व गावकऱ्यांना जेवण अशी शिक्षा ठोठावून जात पंचायतीचे आरोपीला अभय दिले असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला होता.आरोपीवर एमपीडीएची कारवाई करा- नीलम गोऱ्हेमोहलीतील या घटनेची शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत बुधवारी (दि.७) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरु न संपर्कसाधून घटनेची माहिती घेतली. आरोपींवर पॉस्को आणि जातपंचायत कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचे एसपींनी सांगितले. मात्र आरोपी अनिल मडवी याने यापूर्वी असे कृत्य तीन वेळा केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अल्पवयीन मुलीचे समुपदेशन करण्यासंदर्भातही सूचना केली.