शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अखेर गडचिरोली जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहोचल्या नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 5:05 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन संकलन केंद्रांवरून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करून विशेष वाहनाने नागपूरला पोहोचविण्यात आल्या.

ठळक मुद्देसमीक्षकांकडून केंद्रांवर जमाबोर्डाच्या वाहनांना जिल्हाबंदीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन संकलन केंद्रांवरून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जमा करून विशेष वाहनाने नागपूरला पोहोचविण्यात आल्या. नागपूर बोर्डाचे अधीक्षक व लिपिकांसह मदतनीस आणि वाहनचालकाला कोरोनाच्या संचारबंदीमुळे गडचिरोलीत येताना काही अडथळेही निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पोहोचायला एक ते दीड तास उशिर झाला.इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी व्हॅल्युअरने केल्यानंतर त्या उत्तरपत्रिका समीक्षकांकडे पोहोचल्या. मात्र कोरोनाच्या संचारबंदीने रेडझोन असलेल्या नागपूर येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयात समीक्षकांना तपासलेल्या उत्तरपत्रिका पोहोचविता आल्या नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून उत्तरपत्रिका समीक्षकांकडेच पडून होत्या. दरम्यान शिक्षण मंडळाच्या वतीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तपासलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम होत असल्याचे कळविले.नागपूर हे कोरोनाबाबत रेड झोनमध्ये असल्याने तेथून येणाऱ्या वाहनांची आरमोरीपलिकडे वैनगंगा नदी सीमेवरील पोलीस चौकीवर कसून तपासणी केली जात आहे. अशीच तपासणी नागपूर बोर्डाकडून आलेल्या चार वाहनांचीही करण्यात आली. वाहने अडविल्यानंतर बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिली. शिक्षणाधिकारी आर.पी. निकम व उपशिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मध्यस्थीने पोलिसांमार्फत बोर्डाचे चारही वाहन जिल्ह्यात सोडण्यात आले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल