अखेर शाखा अभियंता अरविंद चव्हाण निलंबित

By Admin | Updated: March 2, 2015 01:16 IST2015-03-02T01:16:40+5:302015-03-02T01:16:40+5:30

कोरची पंचायत समितीचे शाखा अभियंता अरविंद चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Finally, the Branch Engineer Arvind Chavan was suspended | अखेर शाखा अभियंता अरविंद चव्हाण निलंबित

अखेर शाखा अभियंता अरविंद चव्हाण निलंबित

गडचिरोली : कोरची पंचायत समितीचे शाखा अभियंता अरविंद चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी शाखा अभियंता अरविंद चव्हाण यांना निलंबित केले आहे.
पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत शाखा अभियंता या पदावर कार्यरत असताना अरविंद बहादुरसिंग चव्हाण यांनी सेवाकाळात आपल्या पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने अवैध मार्गाने आपल्या सेवेतून मिळणाऱ्या शासकीय उत्पन्नापेक्षा ९ लाख ४९ हजार ७९ रूपये कमविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रोशन यादव व गडचिरोली पोलीस ठाण्याच्यावतीने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलम १३ (१) (ई), १३ (२) नुसार गुन्हा नोंदविला आहे. अरविंद बहादूरसिंह चव्हाण यांनी त्यांच्या ताळेबंधावरून अधिकची संपत्ती धारण केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून निष्पन्न झाले होते.

Web Title: Finally, the Branch Engineer Arvind Chavan was suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.