वीज केंद्र अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: December 13, 2015 01:38 IST2015-12-13T01:38:53+5:302015-12-13T01:38:53+5:30
देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागाला वीज पुरवठा करण्यासाठी वीज कंपनीचे केवळ दोन फिडर आहे.

वीज केंद्र अंतिम टप्प्यात
शंकरपूर येथे निर्मिती : वीज खंडित होण्यापासून मिळणार सुटका
देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागाला वीज पुरवठा करण्यासाठी वीज कंपनीचे केवळ दोन फिडर आहे. त्यामुळे विजेचा दाब कमी झाल्यानंतर ग्रामीण भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जात होता. यामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली होती. या समस्येपासून सुटका करण्यासाठी शंकरपूर येथे वीज केंद्राची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून तत्कालीन आ. आनंदराव गेडाम यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार गेडाम यांनी नागपूर येथील वीज कंपनीचे मुख्य अभियंता यांची भेट घेऊन शंकरपूर येथे वीज केंद्र निर्मितीच्या कामाला मंजुरी दिली. मंजुरीनंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सद्यस्थितीत या वीज केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र दोन महिन्यांपासून कंत्राटदाराने काही प्रमाणात शिल्लक राहिलेले काम ठप्प पाडले आहे. त्यामुळे या केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असले तरी पूर्ण झाले नाही.
वीज कंपनीने याकडे लक्ष घालून सदर काम डिसेंबर संपण्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)