आराेग्य व्यवस्थेत सुधारणा करून रिक्त पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST2021-01-13T05:35:25+5:302021-01-13T05:35:25+5:30
गडचिराेली : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ...

आराेग्य व्यवस्थेत सुधारणा करून रिक्त पदे भरा
गडचिराेली : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी केली.
याबाबतचे निवेदन सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग तथा सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री ना. राजेंद्र यड्रावकर यांना गडचिरोलीत सादर केले.
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे. येथे जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, तीन उपजिल्हा व नऊ ग्रामीण रुग्णालय तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. मात्र येथील अनेक पदे रिक्त असल्याने व्यवस्था खिळखिळी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात बाह्यसंपर्क वर्ग एकच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. तसेच वर्ग ३ व वर्ग ४ ची अनेक पदे रिक्त आहेत. याशिवाय ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सिरोंचा येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय आहे. सिराेंचावासीयांसाठी गडचिराेलीपर्यंतचे अंतर २५० किमी असलयाने तेथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करणे आवश्यक आहे. याशिवाय गडचिराेली शासकीय महाविद्यालय सुरू करावे, जिल्हा रूग्णालयात एमआयआर सुविधा उपलब्ध करावी, कुरखेडा, आरमाेरी व अहेरीतील बेडची संख्या वाढवावी, तसेच सीटी सीटी स्कॅनची व्यवस्था करावी, अशी मागणी अरविंद कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादव लोहंबरे, संजय बोबाटे, अमोल मेश्राम, स्वप्निल खांडरे, निकेश लोहंबरे, राहुल सोरते, सूरज बोबाटे, मनोज गेडाम, मुकेश नैताम, शरद मड़ावी, अजय बोबाटे, आदर्श बोबाटे,अजय कोल्हटकर, समीर वलादे, चंदन वाडकर, अमोल गेडाम यांनी केली.